WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2024

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2024

Join Telegram

सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नविन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरूजीवन करणे, सामुहिक शेततळयांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेड्नेटहाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अज्ञद्रव्ये व एकात्मिक कोड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीतोर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2024

अभियानाची उद्दिष्टे:

1) वैविध्यपूर्ण कृषि हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणींतौर तंत्रज्ञान, पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूहू पद्धतीने सर्वांगीन विंकास करणे.
2) शेतक-याना एकत्रित करून शेतक-यांचे गट निर्माण करणे व 3) शेतकरी उत्पादक समूहू स्थापीत करणेसाठी प्रवृत्त करून उत्पादकता व उत्पादन वाढवून निव्वळ उत्पादनात वाढ करणे.
3) शेतक-यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व आहराविषयी पोषणमुल्य वाढविणे.
4) आस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.

5) पारंपरिक उत्पादन पद्धतींची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे.
6) कुशल आणि अकुशल विषेशतः बेरोजगार तरूणांकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

खालील घटकांचा लाभ या योजनेअंतर्गत शेतकरी घेऊ शकतात:

1) उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकांची स्थापना करणे.
2) उतीसंवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण/पुनरुज्जीकरण
3) नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे
4) भाजीपाला विकास कार्यक्रम
5) गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य आयात करणे
6) भाजीपाला, बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण इ. पायाभूत सुविधा
7) नवीन बागांची स्थापना करणे
8) फलोत्पादन यांत्रिकीकरण
9) अळिंबी उत्पादन
10) पुष्प उत्पादन
11) मसाला पिके लागवड
12) जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादकतेत वाढ करणे (आंबा, संत्री, काजू, चिकू, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा)
13) नियंत्रित शेती घटक (हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षिरोधक जाळी, प्लॅटिक आच्छादन, प्लास्टिक टनेल, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान, पॉलीहाऊसमधील/शेडनेट हाऊस मधील उच्च दर्जाच्या फुलपिकांच्या लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान)
14) सेंद्रिय शेती
15) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन
16) परंपरागीकरणासाठी मधुमक्षिका पालन
17) एकात्मिक काढणीपश्चात व्यवस्थापन (पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शितकरण गृह, शितखोली (स्टेजिंग), फिरते पूर्व शितकरण गृह, शितगृह (नवीन/विस्तारीकरण/आधुनिकीकरण), शितसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे, शितवाहन, प्राथमिक/फिरते प्रक्रिया केंद्र, रायपनींग चेंबर, शेतावरील कमी ऊर्जा वापरणारे थंड साठवणूक गृह, कमी किमतीचे फळ-भाजीपाला साठवण केंद्र, कमी खर्चाचे कांडा साठवून्क गृह/कांदाचाळ-२५ मे. टन, पुसा शून्य ऊर्जा आधारित शितगृह -१००किलो, एकात्मिक शितसाखळी पुरवठा प्रणाली-प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वरील घटकांमधील घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.)
18) फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा स्थापन करणे (शासकीय/ खासगी/ सहकारी क्षेत्र)
19) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.

पात्रता
शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
शेतकरी / शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांने शेततळे अस्तरीकरणासाठी अधिकृत ५०० मायक्रॉनची प्लास्टिक फिल्म वापरणे बंधनकारक राहील.
सामूहिक शेततळे घटकाचा लाभ हा शेतकरी समूहासाठी आहे. समूहात २ किंवा अधिक शेतकरी असावेत. शेतकरी संयुख कुटुंबातील नसावेत. शेतकऱ्याचे जमीन धारणेबाबतचे ७/१२ खाते उतारे स्वतंत्र असावेत.
शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी सुखम सिंचन पद्धतीचा वापर करणे बंधनकारक राहील.
पूर्वी केलेले शेततळे, नैसर्गिक खड्डा, दगड खाणी, विहीर इत्यादी. जागी सामूहिक शेततळे/वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण मंजूर करण्यात येणार नाही.
सामूहिक शेततळे या घटकाचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा व कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अर्जदार पात्र राहतील.
सामूहिक शेततळे या घटकाकरीता राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील अर्जदार पात्र राहतील. मात्र उपरोक्त २५ जिल्हे वगळता इतर जिल्यांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना सामूहिक शेततळे हा घटक अनुज्ञेय राहणार नाही.

आवश्यक कागदपत्रे
७/१२ प्रमाणपत्र
८-ए प्रमाणपत्र
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन किंवा बिल

अधिक माहीती व्हॉटसअप  वर मिळवा . 

Click Here to Visit www.mygovnaukari.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, , Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.