WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नोटावरिल चिन्हची महिती आहे का ?

नोटावरिल चिन्हची महिती आहे का ?

२०००-रुपयांची नोट (₹२०००) ही भारतीय रुपयाचे मूल्य आहे आणि १९ मे २०२३ रोजी तिचे विमुद्रीकरण करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतीय रिझर्व बँकेने (RBI) ₹ ५०० आणि ₹ १००० च्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर हे नवीन चलन १० नोव्हेंबर २०१६ रोजी जारी केले होते आणि तेव्हा पासून ते चलनात आले.संपूर्णपणे नवीन डिझाईन असलेल्या बँक नोटांच्या महात्मा गांधी नवीन मालिकेचा हा एक भाग आहे.

दहा रुपयांची नोट
1 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंतच्या नोटा एकामार्फत दुसऱ्याकडे बराच काळ फिरत राहतात आणि त्यामुळेच त्या लवकर खराब होतात. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने या रुपयांची नाणी बनवण्याचा निर्णय घेतला.

जुन्या दहा रुपयांच्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी, अशोक स्तंभ, तर नोटेच्या मागील बाजूस गेंडा, हत्ती आणि वाघाचं चित्र आहे. नवीन दहा रुपयांच्या नोटेच्या उलट बाजूस कोणार्क सूर्य मंदिराच्या चाकांचा फोटो आणि स्वच्छ भारतचा लोगो आहे. 10 रुपयांची नोट छापण्यासाठी सुमारे 96 पैसे खर्च येतो.

पन्नास रुपयांची नोट

50 रुपयांची नोट छापण्यासाठी अंदाजे 20 रुपये खर्च येतो. सध्या 50 रुपयांच्या 1, 81, 4000 दशलक्ष नोटा चलनात आहेत. नोटेच्या मागील बाजूस महात्मा गांधींचं चित्र, अशोक स्तंभ आणि भारतीय संसदेचा फोटो आहे,
जो भारताच्या मजबूत लोकशाहीचं प्रतिनिधित्व करतो. नव्या नोटेच्या उलट बाजूस ‘स्वच्छ भारत’ लोगो आणि हम्पी (कर्नाटक) हे ठिकाण आहे. हंपी हे भारतातील जागतिक वारसा स्थळ आहे.

शंभर रुपयांची नोट

ही नोट छापण्यासाठी 1.20 रुपये खर्च आला असून या मूल्याच्या 16,000 दशलक्ष नोटा बाजारात चलनात आहेत. या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी आणि अशोक स्तंभाचा फोटो आहे, तर या नोटेच्या उलट बाजूस भारतातील सर्वोच्च पर्वत कांचनजंगा पर्वताचा फोटो आहे.

note : नोटेच्या मागच्या बाजूला ‘राणी की वाव’ असे चित्र आहे, जे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे चित्रण करते. नोटेचा मूळ रंग लैव्हेंडर आहे

पाचशे रुपयांची नोट

2016 मध्ये नोटाबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांची जागा 500 रुपयांच्या नव्या नोटांनी घेतली. नवीन पाचशेच्या नोटांच्या छपाईसाठी अंदाजे 2.94 रुपये खर्च येतो. या नोटेच्या उलट बाजूस ‘स्वच्छ भारत’ आणि दिल्लीच्या ‘लाल किल्ल्या’चे चित्र आहे.

 

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मराठीत मोफत जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mygovnaukari.com ला भेट द्या